कुरधुंडा येथील शिवसेना पॅनलच्या उमेदवाराणी भरला शक्ती प्रदर्शन करत अर्ज

 *जमूरत अलजीच्या नेतृत्वाखाली मोठे शक्ती प्रदर्शन*

* गावचा विकासच विजयाची मूर्तमेढ रोवणार*


संगमेश्वर प्रतिनिधी

              संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा गावच्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडूणुकीचे वारे वाहू लागले असून आज शिवसेनेच्या पॅनल ने कुरधुंडा गावचे भाग्य विधाते जमूरत अलजी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या जनसंख्येत शक्ती प्रदर्शन करत आपला आणि आपल्या समवेत असणाऱ्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूकच्या पूर्वीच शिवसेना पॅनलला मतदारांनी वाढता पाठींबा दिल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची चर्चा असल्याचे बोलले जात आहे.

             ग्रामपंचायत कुरधुंडा या ग्रामपंचायतची निवडणूक लागली असताना अनेक उमेदवार  ग्रामपंचायत निवडणूक लढवायला बाशिंग बांधून उभे राहिले असताना शिवसेनेचे पॅनल भक्कम पणे तयार करून आज तहसीलदार देवरुख येथे निवडनुक निर्णय अधिकारी श्री. पारशे यांच्या कडे प्रभाग 2मधून गावचे माजी सरपंच  जमूरत अलजी, आणि शाहिस्ता अलजी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रभाग 3 मधून गावच्या माजी उपसरपंच नाझीमा बांगी, तैमूर अलजी, सबा अलजी, आणि अब्दल्ला फकीर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यांना त्यांच्या त्यांच्या प्रभागातुन वाढता पाठींबा आस ल्याचे बोलले जात आहे.

           कुरधुंडा गावची निवडणूक चुरशीची आणि रंगदार  होणार असून अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.अर्ज भरन्यासाठी प्रभागातील प्रमुख लोक उपस्थिती होते त्यामध्ये उमर अलजी, ईरफान मुल्ला, महमंद अलजी, हुसैन अलजी, उस्मान मालगुंडकर, दिलावर मालगुंडकर, महंमद धामस्कर, जाहिद खान, विशाल खापरे, अंनत पाताडे, संदेश निंगावले, सुरेश खापरे, गणपत खापरे, संजय जाधव, संदीप जाधव, सुनील जाधव, अविनाश लिंगायत,महंमद मुल्ला, मुदस्सर खान, एजाज अलजी, शदात शेख, इरफान सोलकर, दैयान बांगी, आदी सहित शेकडो मतदार उपस्थित होते.



Comments