राजापूर ः शहरातील ब्रिटीशकालीन वखारीचे पुनर्निर्माण करण्यासाठी नुकतीच अस्थायी समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी चंद्रप्रकाश नकाशे यांची निवड करण्यात आली आहे.
या समितीच्या प्रमुख कार्यवाहपदी जगदीश पवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून पत्रकार महेश शिवलकर, सदस्यपदी संदीप पवार, प्रदीप कोळेकर, राजाभाऊ रसाळ, विजय कुबडे, वृषाली नकाशे, विनय गुरव आदींची निवड करण्यात आली आहे. ऐतिहासिक ठेवा आणि पर्यटनस्थळ म्हणून ब्रिटीशकालीन वखारीचे पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने या समितीच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत, पालकमंत्री अनिल परब, सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी यांना निवेदन देण्यात आली असून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदीत्य ठाकरे यांची भेट घेण्यात येणार आहेत.
Comments
Post a Comment