राजापूरात गांजाचे सेवन कोण करतात याचा तपास पोलिस प्रशासन करणार काय?

 मुंबई-राजापूर लक्झरी बसमधील चालकाच्या केबीनमध्ये तब्बल ४१ हजार रुपयांचा गांजा सापडला


गांजा तसेच खाजगी प्रवाशी बस असे मिळून एकूण 14,46,320/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त


रत्नागिरी प्रतिनिधी:-

मुंबईवरुन राजापूरात येणा-या लक्झरी बस मध्ये चालकाच्या केबीनमध्ये तब्बल ४१ हजार रुपयांचा गांजा सापडल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर राजापूरात गांजाचे सेवन नेमके कोण कोण करतात, कोणत्या गावांमध्ये गांजाचा सप्लाय होतो?, लक्झरी बसमधून आलेला गांजा नेमका कशासाठी? याची सखोल तपासणी पोलिस प्रशासन करणार का? पोलिस प्रशासन याबाबत खरोखरच सखोल चौकशी करणार का?असा सवाल उपस्थीत केला जात आहे.      

मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथे सापळा रचुन मुंबई येथुन राजापुर येथे जाणारी लक्झरी बस क्र.एमएच-01-एसी-4278 हि संशयित गाडी थांबवुन सदर गाडीची तपासणी केली असता सदर गाडीचे चालक (1) महादेव लक्ष्मण धवळगी वय-35 वर्षे, रा.लांजा भटवाडी,ता.लांजा, जि. रत्नागिरी (2) प्रतिक हरीश्चंद्र मयेकर वय-24 वर्षे रा. राजापुर यांचे ताब्यामध्ये ड्रायव्हर केबीनमध्ये असलेल्या एका सॅकमध्ये 41,000/- रु. किंमतीचा 2 किलो 139 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. सदर कारवाईमध्ये गांजा हा अंमली पदार्थ तसेच खाजगी प्रवाशी बस असे मिळून एकूण 14,46,320/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील वरील नमूद दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

        सदरबाबत सदरबाबत पोउनि श्री. विकास चव्हाण यांचे तक्रारीवरुन रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्राचा तपास सपोनि श्री. आबासाहेब पाटील हे करीत आहेत. सदरच्या दोन्ही कारवाया मा. पोलीस अधिक्षक श्री. मोहितकुमार गर्ग आणि अपर पोलीस अधिक्षक श्रीमती जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधिक्षक श्री. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोनि शहा, पोउनि विकास चव्हाण,पोहेकॉ/751 संजय कांबळे, पोहेकॉ/965 संदीप कोळंबेकर, पोहेकॉ/1188 सुभाष भागणे,पोहेकॉ/251 शांताराम झोरे, पोहेकॉ/477 नितीन डोमणे, पोहेकॉ/886 राकेश बागुल, पोहेकॉ/456 मिलींद कदम,पोहेकॉ/574 अरुण चाळके,पोहेकॉ/65 प्रशांत बोरकर,चापोहेकॉ 1049 संजय जाधव, पोना/1399 अमोल भोसले, पोना/909 विजय आंबेकर, पोना/135 बाळु पालकर, पोना/135 सागर साळवी, पोना/1410 सत्यजित दरेकर यांनी केली.


चौकट:-

बस मालकाची चौकशी होणार काय?

जनतेला प्रवासाची सुविधा देण्याच्या हेतूने लक्झरी बस सेवा दिली दिली जाते. ज्या लक्झरी बस मध्ये चालकाच्या केबीन मध्ये गांजा सापडला त्या बस मालकाची सूद्धा कसून चौकशी होणार का आआ सवाल उपस्थीत केला जात आहे. प्रवाशांना सेवा देत असताना बस मालकाची जबाबदारी काय याबाबत देखील पोलिस यंत्रणेने तपास करणे गरजेचे नाही का?

Comments