महाविकस आघाडी सरकारच्या काळात कोकणाचा विकास खुंटला हे दुर्दैव ;

 पंतप्रधान यांनी काय करावे हे कोणी आम्हाला शिकवू नये , आपण केंद्राचा विचार न करता राज्यात काय सूरू आहे हे पहावे 

 

 विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची टीका 


 _*चिपळूण _ – शिवसेनेच्या आजच्या सामना मुखपत्रात रोखठोक सदारामधून  मोदी व शहा यांच्या मनमानीने आणि चार-पाच उद्योगपती मिळून देश चालला असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. रोखठोकमधून आरोप करताना वास्तव काय आहे हे त्यांनी पडताळून पहावे आणि मग भाष्य करावे अशी टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. 

       आज चिपळूण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले, मोदींजींवर टीका करण्यापेक्षा राऊतांनी राज्यातल काय सूरू आहे हे पहावे, अनैसर्गिकरित्या आलेल्या सरकारमध्ये जी खलबते सूरू आहेत ती त्यांनी संभाळावी असा टोला दरेकर यांनी  राऊतांना  लागवला.यावेळी जिल्हाध्यक्ष विनय नातू ,उपजिल्हाध्यक्ष रामदास राणे, नगरसेवक व शहराध्यक्ष अशिष खातू ,नगरसेवक निशिकांत भोजने,आशिष जोगळेकर,प्रणव वाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

       कोकणातील प्रकल्पाविषयी बोलताना दरेकर म्हणाले की, अनैसर्गिकरित्या आलेल्या सरकराला एक वर्ष पुर्ण झाले आहे.एका वर्षात या महाविकास आघाडी सरकराने कोकणवासियांसाठी कोणतेही प्रकल्प आणले नाहीत असा आरोप दरेकरांनी केला.काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अपेक्षा नव्हत्या परंतु ज्या शिवसेनेला मोठं करण्यामागे कोकणचा वाटा होता, शिवसेना कोकणातील लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठी झाली आहे.

रत्नागिरी किंवा कोकणसाठी एकही मोठा प्रकल्प, एकही विकासाची योजना शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आणली गेली नाही हे दुर्दैव असल्याची खंत दरेकरांनी त्यावेळी व्यक्त केली. 

         शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना दरेकर म्हणाले की, देशामध्ये शेतकऱ्यांच्या मनात कृषि कायदयाविषयी शंका निर्माण केली जात आहे.

जो कायदा या देशाच्या, राज्याच्या शेतक-यांसाठी हिताचा आहे तो कायदा कसा चुकीचा आहे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर काही मूठभर दलाल शेतक-यांच्या नावावर आंदोलन उभे केले. देशातील एखाद- दुसरे राज्य सोडले तर या आंदोलनात शेतकऱ्यांचा सहभाग नाही.महाराष्ट्रामध्ये काही नेत्यांनी शेतकऱ्यांना चिथविण्याचा प्रयत्न केला.

हा कृषी कायदा कसा चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला माहित आहे की नेमकी वस्तुस्थिती काय आहे,असा टोला दरेकर यांनी यावेळी लागवला.

          निसर्गवादळामुळे आलेल्या आपत्ती संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले सरकारने घोषणा केली रायगड जिल्ह्याला १०० कोटी २५ कोटी रत्नागिरी, २५ कोटी सिंधुदुर्ग, प्रामुख्याने मंडणगाव आणि दापोली या दोन गावावर निसर्गवादळामुळे नुकसान झालं.  आजही ६०% लोकांना निसर्गवदळाची भरपाई मिळाली नाही.शाळा उध्वस्त झाल्या,  पूर्णातुप्ती साठी मागणी केली होती अजूनही १% सुद्धा रक्कम दिला गेला नाही, शाळा अजूनही बंद आहे. बागायतांना अजुन मदत केली नाही.नुकसानग्रस्त शेतकरी आजही सरकारकडे आशेने बघत आहे, असे दरेकरांनी त्यावेळी सागितले.

Comments