दापोली येथे निघाली सायकल फेरी

 दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण, त्यापासून शरीरासोबत पर्यावरणाचे नुकसान होत आहे. याविषयी जनजागृती दापोलीकर नेहमीच करत असतात. पर्यावरण जपण्यासाठी सायकल कशी उपयुक्त आहे हा संदेश देण्यासाठी आणि सायकलचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा यासाठी दापोलीतील सायकलप्रेमी शनिवार २६ डिसेंबर २०२० रोजी सायकल फेरी काढली. ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ८ वाजता मान्यवर नागरिकांच्या उपस्तितीत सुरु झाली या सायकल फेरी मधून सायकल चालवा, आरोग्य जपा आणि प्रदुषण टाळा हा संदेश देत नागरीकांमध्ये जनजागृती केली गेली. या सायकल फेरी मधील अंतर तीन ते सहा किमीपर्यंत होते आणि सायकल सावकाश, कमी वेगाने चालवल्या जातील. यामध्ये दापोलीकरांनी आपल्या मुलांना आणि नातवंडांना घेऊन सामील झाले. जेणेकरुन पुढील पिढीमध्ये सायकल चालवण्याची आवड तयार होऊन दापोलीतील पर्यावरण जपले जाईल. आणि सायकलमुळे आरोग्य पण तंदुरुस्त बनेल, इंधनाचे पैसे वाचतील.

Comments