मिश्कील सासू अन् खट्याळ सून; येऊ कशी तशी मी नांदायला ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
'येऊ कशी तशी मी नांदायला'मध्ये पाहायला मिळणार सासू-सुनेचा खट्याळ अंदाज
लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्र येणं नव्हे, तर दोन कुटुंब जोडली जाणं. आपलं माहेर, हक्काची माणसं सोडून मुलगी नव्या घरात जाते आणि तिथल्या माणसांना आपलसं करते. प्रत्येक गोष्ट शेअर करायला नवरा जरी सोबत असला तरीदेखील अनेकदा मुलींना त्यांच्या मैत्रिणींची उणीव भासत असते. परंतु, जर अशावेळी सासूचं मुलीची मैत्रीण झाली तर? खरं तर सासू-सुनेमधील मैत्रीचं हे नातं फार कमी वेळा पाहायला मिळतं. परंतु, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत असंच सासू-सुनेचं मैत्रीचं नातं पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या प्रोमोमुळे अनेकांना या मालिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही मालिका नेमकी कधी सुरु होणार हा एकच प्रश्न प्रेक्षकांना सतावत आहे. मात्र, या मालिकेसाठी प्रेक्षकांना आता फार काळ वाट पाहवी लागणार नाहीये.
ही गोष्ट आहे शकु आणि स्वीटूची .. नात्यानं या दोघी सासू -सुना आहेत. पण मनात मात्र, त्यांच्या मैत्रीच्या धाग्याची विण घट्ट बांधली गेली आहे. या मालिकेत अभिनेत्री शुभांगी गोखले, अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर अदिती सारंगधर, दिप्ती केतकरदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, या मालिकेचं दिग्दर्शन अजय मयेकर करत असून पटकथा सुखदा आयरे यांनी लिहिली आहे. ही मालिका नव्या वर्षात म्हणजे ४ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Post a Comment