आमदार श्री. राजनजी साळवीच्यां नाणार रिफायनरी प्रकल्प होण्याबाबत केलेल्या विधानाशी मी सहमत- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य मा. श्री. बशीरभाई मुर्तुझा
राजापुर तालुक्यामध्ये येणारा नाणार प्रकल्प बहुसंख्य लोकांना हवा असेल तर तो नक्की यावा असे आमदार श्री. राजन साळवी यांनी मत प्रदर्शीत केले हे मत खरोखरच चुकीचे नसुन बरोबर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य मा. श्री. बशिरभाई मुर्तुझा यांनी सांगितले. श्री. राजन साळवी यांच्या स्टेटमेंटचा काही लोक राजकीय पोळी भाजण्यासाठी करुन घेत आहेत असे त्यांनी सांगितले. बहुसंख्य लोकांना जर तो प्रकल्प हवा असेल तर माझी पण त्याला सहमती आहे असे आमदार श्री. राजनजी साळवी यांनी आपले मत मांडले त्यामध्ये त्यांनी काय चुकीचे बोलले लोकशाहीमध्ये बहुसंख्य लोकांना जे हवे असते तेच आपण करायचे असते असे मा. श्री. बशिरभाई मुर्तुझा यांनी सांगितले.
राजापुर तालुक्यामध्ये येणा-या नाणार प्रकल्पाला सुरुवातीला लोकांचा विरोध होता तेव्हा त्यांनी लोकांची बाजु घेतली असेल परंतु आज त्यांनादेखील कळते आहे आजच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी अनेक जमीनदार असतील तसेच त्या ठिकाणचे स्थानीक असतील ह्या सर्वांना नाणार प्रकल्प हवा आहे. प्रकल्प होण्यासाठी मत मांडणारी अनेक सुशिक्षीत नागरीक भेटत आहेत मग त्यामध्ये वकील असतील व्यापारीवर्ग असेल कामगार, शेतकरी, जमीनदार असेल अशी सगळीच लोक म्हणत आहेत आम्हांला प्रकल्प हवा आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुर्वीपासूनच एखादा उद्योग यायचा ठरला की येथील लोकांमध्ये अफवा पसरवण्याचे काम सुरु होते आणि लोकांना घाबरविले जाते आणि काही अंधश्रध्देतुनसुध्दा लोकांवर दबाव आणला जातो त्यामुळे येथील लोक घाबरुन जातात भांबाऊन जातात आणि त्या येणा-या उद्योगाला ते विरोध करतात परंतु त्यांना हे कळत नाही आहे की ते आपल्याच पायावर दगड मारुन घेत आहेत. नाणार प्रकल्पामधुन 55000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत या नाणार प्रकल्पामुळे फक्त रोजगार नव्हे तर नाणार प्रकल्प हा रिफायनरी प्रकल्प आहे आणि रिफायनरी प्रकल्प होणे ही देशाची एक मोठी गरज आहे ह्यांच्यामध्ये देशासाठीसुध्दा आपण हातभार लावणार आहोत हासुध्दा एक विचार लोकांच्या मनात असणे गरजेचा आहे मा. श्री. बशिरभाई मुर्तुझा यांनी सांगितले.
नाणार प्रकल्प का हवा आहे कारण कोकणामधील सर्वात महत्वाची गोष्ट आई-वडील आपला मुलगा पदवीधर होण्याकरीता त्याच्या शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेतात आणि शिकवतात ती व्यक्ती पदवीधर झाल्यानंतर ज्यावेळेला नोकरी लागते ती मुंबई किंवा पुण्याला लागते कारण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये मोठे उद्योग नाहीत. मुंबईला आणि पुण्याला जाऊन नोकरी करावी हे चित्र कुठेतरी बदलले पाहीजे आणि त्यासाठी थोडी त्यागाची पण भावना पाहीजे आणि त्यामुळे जर अशा पध्दतीने आपण थोडीफार इंडस्ट्री येऊ दिली तर त्याच्यामधून आपल्या पुढच्या पिढीचा विकास होईल असे मा. श्री. बशिरभाई मुर्तुझा यांनी सांगितले. नोकरीसाठी मुंबई किंवा पुणे गेल्यावर काही काळ संघर्ष केल्यानंतर नोकरी मिळते. नोकरी सुरु केल्यानंतर त्याला लग्न करायचे असते आपला संसार थाटायचा असतो जेव्हा लग्न करायला जातो तेव्हा त्याठिकाणी तो फ्लॅट घेताना त्याला पुन्हा कर्ज घ्यावे लागते. सुरुवातीला मुलाला शिकवण्यासाठी आई वडीलांनी कर्ज घेतले नंतर मुलाला आपल घर बसवण्यासाठी पुन्हा कर्ज घ्यावे लागले म्हणजेच पहीली पिढी कर्जामध्ये दुसरी पिढी कर्जामध्ये अशा दोन दोन पिढ्या कर्जामध्ये बुडण्याचे एकमेव कारण येथील जे लोकप्रतीनिधी आहेत त्यांनी आजपर्यंत या ठिकाणी रोजगार निर्माण करण्यासाठी काहीच केलेले नाही. श्री. राजन साळवी यांच्या लक्षात हे उशीरा का होईना पण त्यांच्या सारख्यांच्या हे लक्षात कदाचित आले असे मला वाटते आणि त्यावेळेला ते म्हणाले की लोकांचा जर विरोध नसेल आणि जास्त लोकांचा पाठींबा असेल तर माझ काही म्हणण नाही या त्यांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो या पध्दतीने सर्वानी विचार केला पाहीजे असे मा. श्री. बशिरभाई मुर्तुझा यांनी सांगितले.
रत्नागिरी तालुक्यामध्ये ज्यावेळी पंचतारांकीत एमआयडीसी जाहीर झाली होती ती एमआयडीसी सुध्दा काही ठरावीक लोकांनी त्याला विरोध करुन लोकांना भडकवले आणि त्या लोकांमुळे ती एमआयडीसी रद्द झाली. पंचतारांकीत एमआयडीसीमुळे या ठिकाणी मोबाईल, पेन, चश्मे, टी.व्ही, कॉम्प्युटर, लॅपटाप, कपडे इ. बनवण्याचे असे अनेक प्रकारचे कारखाने होणार होते पण ते कारखाने होऊ शकले नाहित. एमाआयडीसी रद्द करुन शासनाने घेतलेल्या जमीनीचे 7/12 सगळ्यांना कोरे करुन दिले पण काय घडल त्या जमीनी लोकांकडे आहेत का? बहुतांश लोक त्या जमीनी विकुन मोकळे झाले आणि आज परप्रांतियांनी जमीनी घेऊन तिथे प्लाटिंग करुन ते विकले म्हणजे बोलायचा अर्थ असा की जमीन पण गेली आणि नोकरी पण गेली ही परिस्थीती निर्माण झालेली आहे. पंचतारांकीत एमआयडीसी आज रद्द झाल्यानंतर त्या ठिकाणचा जो बहुसंख्य समाज आहे मग तो शेतकरी असेल, कामगार असेल तो समाज आजही त्याठिकाणी फक्त राबतो आहे आणि फक्त राबतो आहे. पंचतारांकीत एमआयडीसी जर आली असती त्याठिकाणी प्रत्येकाच्या घरात मोटरसायकल, टि.व्ही आदी गोष्टी आल्या असत्या प्रत्येकाचे घर झाले असते एवढा पगार त्यांना मिळाला असता त्याचे कारण 70000 लोकांना तिथे रोजगार मिळणार होता. पंचतारांकीत एमआयडीसी न झाल्यामुळे तो रोजगार त्याठिकाणी मिळाला नाही आणि म्हणून त्याठिकाणची लोक रोजगारासाठी वंचीत झाली. पंचतारांकीत एमआयडीसी रद्द झाली ती जी गोष्ट आहे ती आज आपण धडा म्हणून घ्यावी असे मा. श्री. बशिरभाई मुर्तुझा यांनी सांगितले.
श्री. राजन साळवी यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी हा प्रकल्प किंवा अशाप्रकारचे इतर प्रकल्प आणून कोकणातील लोकांना कोकणच्या भुमीमध्ये रोजगार निर्मितीचे जर त्यांनी स्वप्न मनाशी बांधल आणि स्वप्न पुर्ण केले तर ही आजची पिढी त्यांची कायम ऋणी राहील ती कधीही त्यांच्या विरोधात जाणार नाही म्हणून मी स्वतः म्हणतो की ह्या पिढीने त्यांच्या वाक्याचे स्वागत केले पाहीजे म्हणुन आमदार श्री. राजन साळवीच्यां वाक्याचे मी स्वागत करतो असे मा. श्री. बशिरभाई मुर्तुझा यांनी सांगितले.
Comments
Post a Comment