सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे
रत्नागिरी : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. महापालिका क्षेत्रात निर्बंध असल्यानं सध्या मोठ्या संख्येनं पर्यटन कोकणात दाखल होत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, सातारासह इतर भागांमधून पर्यटक कोकणात येत आहेत.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची वाढती संख्या पाहता सध्या याठिकाणची हॉटेल्स, रेस्टॉरंटसह होम स्टे देखील फुल्ल झाल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या वाढली आहे.या ठिकाणी कोणतेही कडक निर्बंध नसले तरी पर्यटकांनी कोरोनाकाळातील नियम पाळावेत असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

Comments
Post a Comment