जैतापूर येथील निर्मल सागर तट अभियानाचा फज्जा; गार्डन झाले जंगल, पर्यटक कसे येणार जैतापूर येथील मेरिटाईम बोर्ड कार्यालयाचे खरोखरच लक्ष आहे काय? जैतापूर ग्रामपंचायत पर्यटन विकासासाठी खरोखरच १०० टक्के प्रयत्न करत आहे का?

 महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून समुद्रकिना-यांच्या लगत पर्यटन स्थळे विकसित करण्याच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांचा निधी खर्ची करण्यात आला. मात्र या विकास कामांची परिस्थिती नेमकी काय आहे याची पाहणी अधिका-यांनी केली आहे का असा प्रश्न जनतेला पडतोय. जैतापूर येथील समुद्रकिना-यालगत निर्मल सागर तट अभियाना साठी लाखो रुपयांचा निधी खर्ची करण्यात आलाय. मात्र या अभियाना पुरता फज्जा उडाला आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या वतीने लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खर्ची करण्यात आला आहे. पण प्रशासनाच्या उदासिनतेमुळे सध्या हे पर्यटन स्थळ म्हणावे की जंगल असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे. 

जैतापूर समुद्रकिना-यालगत पाच बैंच, चेंजींग रुम, शौचालय, कचरा कुंड्या, चप्पल स्टँड लाईफ जैकेट, २०० मिटर रोप, २ रेस्टींग चेअर, माहीती फलक, स्टोअरेज टाकी, फिल्टर, सुरुबन येथे जेटी, अॅप्रोच रोड आदी साठी लाखो रुपये खर्ची करण्यात आलेत. मात्र या सुविधांची सध्या भग्नावस्थेत गेल्यासारखी परिस्थिती आहे. खुप जंगल निर्माण झाले आहे. काही सुविधांची मोडतोड झाली आहे. झाडे कोसळून पडली आहेत. कचरा निर्माण झाला आहे. या सर्वाला जबाबदार नेमके कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीची देखील तितकीच जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामपंचायत या समुद्रकिना-याच्या पर्यटन दृष्ट्या विकासासाठी किती प्रयत्न करते ही देखील बाब महत्त्वाची आहे. संबांधीत विभागाने या जैतापूर येथील मेरिटाईम बोर्डाच्या या कामाची चौकशी करुन हा समुद्रकिनारा पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.


Comments