गोळप नवेदर पावस येथे छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद
श्री.दत्त जयंती चे औचित्त साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गोळप नवेदर वाडी दत्त मंदिर येथे हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये एकूण 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सर्व दात्यांचे प्रमाणपत्र देऊन आभार मानण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून हे शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, राजरत्न प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. सचिन जी शिंदे साहेब, हिंदू राष्ट्र सेनेचे विद्यमान सदस्य श्री.प्रविण रोडे साहेब, इत्यादी मान्यवर उपस्थित होते . मान्यवरांचे स्वागत छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष श्री.सुनिलजी धावडे साहेब,कार्यध्यक्ष श्री.संतोषजी आग्रे साहेब यांनी केले.
तसेच छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे पदाधिकारी व सदस्य संघटक श्री.समीर धावडे, सचिव श्री. समीर गोताड, प्रवक्ता श्री. संगम धावडे, सदस्य श्री. संदेश धावडे,श्री. प्रविण धावडे, श्री. विजय धावडे, प्रशांत कांबळे उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी गोळप निवेदर वाडीतील सर्व ग्रामस्थ यांनी प्रचंड मेहनत घेतली. छावा प्रतिष्ठान कडून कोरोनाच्या काळातील 3 रे रक्तदान शिबीर आयोजित केले गेले त्यामुळे छावा प्रतिष्ठान रत्नागिरी च्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे .

Comments
Post a Comment