ग्रामपंचायतीचे अर्ज आता ऑफलाईन (पारंपरिक) पध्दतीने
राज्य निवडणूक आयोगाचा तातडीचा निर्णय
वेळेतही केली वाढ
▪️राज्यातील सुरु असलेल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या बुधवारी दुपारपर्यंत आहे.
मात्र काल संध्याकाळपासून राज्यात सर्वच ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेकांना इच्छा असूनही ऑनलाईन अर्ज दाखल करता आलेले नाहीत.
हिच अडचण लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने तातडीने निर्णय घेत ऑनलाईन ऐवजी आता ऑफलाइन पध्दतीने (पारंपरिक) अर्ज दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अर्ज भरण्याची वेळ ३० डिसेंबर दुपार सोडून ३० डिसेंबर संध्याकाळी ५:३० अशी करण्यात आली आहे.
यामुळे राज्यभरातील हजारो संभाव्य उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
Comments
Post a Comment