रत्नागिरी जिल्हा काँग्रेसला अॅड विजयराव भोसले यांच्या नेतृत्वा खाली चालना मिळाली = प्राचार्य अॅड राजशेखर मलुष्टे .
संगमेश्वर -२८ डिसेंबर कॉंग्रेसला १३५ वर्ष पुर्ण झाले निमित्ताने रत्नागिरी जिल्हा काँग्रेस च्या वतीने वर्धापन दिन साजरा केला तेंव्हा काँग्रेस च्या स्थापनेचे तत्व आणि कार्यरचना या विषयावरील व्याखानाचा पुष्प गोफ विनला. तेव्हा रत्नागिरीतील जेष्ठ विधिज्ञ प्राचार्य अॅड. राजशेखर मलुष्टे आपल्या ओघवत्या व्याखानात म्हणाले की काँग्रेसची स्थापनाच मुळी सर्वजनांची मिळून एक सोशल अक्टीव्हीटी , सामाजिक लोकशाही , सामाजीक प्रश्न आणि समाजाची मागणी ( डिमांड ) त्याची शांतता पूर्ण पुर्तता आणि ती ही सत्याच्या मार्गाला धरुन करणे आणि जनतेला न्याय मिळवून देणे यावर आधारीत झाली आहे . म्हणून काँग्रेसच्या तत्व मांडणीत जाती , समाज , धर्म भेद , ऊच्च निचता कोठेही नाही . म्हणूनच सर्वांना शेवटी काँग्रेसच बरोबर वाटते आणि आता सुद्धा काँग्रेस शिवाय पर्याय नाही हे काँग्रेस विरोध करणाऱ्यांना वाटत आहे पण त्यांना काँग्रेसच्या प्रवाहात आणून त्यांचा सन्मान ठेवून त्यांना कृतीशील करणेसाठी काँग्रेसच्या प्रत्येक सामान्य कार्यकर्ता पासुन ते तालुका , जिल्हा पदाधिकाऱ्यांपासुन , विभागीय राज्यस्तरांपर्यंत नेत्यानी सुद्धा रोज किमान दहा कार्यकर्तांशी संपर्क केला पाहीजे तरच पुढील पंधरा वर्षात रत्नागिरी जिल्हातील सर्व संस्था , पंचायत समित्या , जिल्हा परिषदा , विधानसभा , लोकसभा यावर सत्ता काँग्रेसची राहील कारण काँग्रेसची तत्व ही माणसुकीची जनाधार असलेली तत्व आहेत ही तत्व आणि त्याबर कृती ही आक्रमक पणे जनतेसमोर मांडली पाहीजेत हे सुत्र वेगवेगळी ऊदाहरणे देवून मांडले ते म्हणाले काँग्रेस पक्षाला आणि पक्षकडून जनतेला आईच्या मायेच्या ऊबेची गरज आहे ती आईची माया रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अॅड विजयराव भोसले देत आहेत हे गेली वर्षभर आम्ही लोक पाहतो आहोत आणि त्यांच्या या प्रयत्नाला साथ देणे हे एक काँग्रेस प्रेमी म्हणून माझे कर्तव्य समजतो या भावनेतून मी येथे आलो आमच्या सारख्या असंख्य जनांना असे वाटते की काँग्रेस पुन्हा ऊभी राहिली तरच या देशात स्थिरता , शांतता आणि संरक्षण मिळू शकते पण या साठी ज्याच्या ज्याच्या मनात काँग्रेस आहे त्याने त्याने निरपेक्ष पणे कसलीही अपेक्षा न करता आपले कुटूंब , भाऊ , बहिनी, नातेवाईक , मित्र या अशा बारा ते पंधरा कुटूंबातील एक एक सदस्य काँग्रेस साठी जोडला तरी पक्ष वाढीला चालना मिळेल हे प्रतिपादन प्राचार्च अॅड मलुष्टे यांनी केले .१३५ बर्ष पुर्ण झाल्या निमित्ताने कार्यक्रमा मध्ये मनोगत माजी आमदार हुस्न बानू खलपे ,महाराष्ट्र चिटणीस इब्राहिम दलवाई , अॅड विजयराव भोसले ,खेर , महाडवाला , माई सुर्वे , अशोकराव जाधव , बंडूशेठ सावंत , अन्वर काद्री ,आशपाक तांबू , हारीश शेखासन यांनी व्यक्त केले सुत्र संचालन दिपक राऊत यांनी केले व आभार केले .
Comments
Post a Comment