'ऑपरेशन रत्नदुर्ग ' ( डमी डिकॉय ) मुंबई येथे सन १ ९९ ३ मध्ये झालेला बॉम्बरफोट व २६/११

  'ऑपरेशन रत्नदुर्ग ' ( डमी डिकॉय ) मुंबई येथे सन १ ९९ ३ मध्ये झालेला बॉम्बरफोट व २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अतिरेक्यांनी सागरी मार्गाचा वापर केल्याचे स्पष्ट झाल्याने सागरी सुरक्षेला असणारे आत्यंतिक महत्व आलेले आहे . यातुन सागरी सुरक्षेसाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरु करण्यात आल्या . यापैकी समुद्र किनारी असलेल्या गावामध्ये विशेष सागरी पोलीस ठाणे आणि किनारपट्टीकडे जाणा - या रस्त्यावर पोलीस चेकपोस्ट उभारण्यात आले . मुंबईला लागुनच कोकण किनारपट्टी असल्याने ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर दहशतवादी / अतिरेकी घुसखोरी करुन हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही . याकरीता मा . पोलीस अधीक्षक , रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व सुरक्षा यंत्रणेची सतर्कता तपासण्याच्या अनुषंगाने दि .२६ / १२ / २०२० रोजी संपुर्ण जिल्ह्यात ' ऑपरेशन रत्नदुर्ग ' ( डमी डिकॉय ) मोहीम राबविण्यात आली . ' ऑपरेशन रत्नदुर्ग ' करीता रेड फोर्स ( शत्रु पक्ष ) व ब्ल्यु फोर्स अशी दोन पथके तयार करण्यात आलेली होती . रेड फोर्सकडून जिल्ह्यातील मर्मस्थळे , गर्दीचे ठिकाणे , चेकपोस्ट इत्यादी ठिकाणे टारगेट करण्यात आले . सदर मोहीमेकरीता रेड फोर्स म्हणुन २ वाहने , ६ बनावट दहशतवादी यांचा वापर करण्यात आला . सदर दहशतवाद्यांकडून बनावट स्फोटक पदार्थ वाहनातुन वाहतुक करुन सुरक्षेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी वाहुन नेण्याचा प्रयत्न करण्यात आला . ब्ल्यु फोर्स म्हणुन जिल्ह्यातील मर्मस्थळे , गर्दीचे ठिकाणे , चेकपोस्ट इत्यादी ठिकाणी ३५ पोलीस अधिकारी व २३२ पोलीस अंमलदार , ७० होमगार्ड , २७ सुरक्षा वॉर्डन इत्यादी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता . रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील भाट्ये चेकपोस्ट येथे रेड फोर्समधील बनावट दहशतावाद्यांनी बनावट स्फोटक पदार्थ वाहतुक करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्यामुळे बनावट दहशतवादी यांना वाहनासह पकडण्यात आले . त्यांचेकडे संशयीत वस्तु आढळून आल्याने तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष येथे कळवुन राखीव फोर्स , बॉम्ब शोधक व नाशक पथक , अग्नीशामक दल यांना पाचारण करण्यात आले . व दोन्ही बाजुची वाहतुक थांबविण्यात आली . बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून संशयीत वस्तुंची तपासणी करण्यात आली . त्यात आक्षेपार्ह / संशयीत काही आढळून आलेले नाही . त्यानंतर चेकपोस्टवरील वाहतुक सुरळीत करण्यात आली . याचप्रकारे गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील आबलोली चेकपोस्ट व जयगड पोलीस ठाणे हद्दीतील खंडाळा येथे सुरक्षा यंत्रणेची सतर्कता तपासण्यात आली . तेथील सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्यामुळे रेड फोर्सला यशस्वी होता आले नाही . अशाप्रकारे ' ऑपरेशन रत्नदुर्ग ' ( डमी डिकॉय ) मोहीम यशस्वीरित्या पार पडलेली आहे . मोहीमेचे नोडल अधिकारी म्हणुन श्री . जयदिप कळेकर , सहा . पोलीस निरीक्षक , सुरक्षा शाखा , रत्नागिरी यांनी कामकाज पाहीले . यापुढेही मा.पोलीस अधीक्षक , रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्कता तपासणेसाठी सर्व विभागाशी समन्वय ठेवुन सुरक्षा यंत्रणा बळकट व परिणामकारक होईल याकरीता अशा प्रकारची वेगवेगळी अभियाने राबविण्यात येणार आहेत

Comments