दापोली शहरातील मेहता पेट्रोल पंपावर खाजगी बसला आग लागली , यामध्ये पंपावरील कर्मचारी राजू भुवड गंभीर भाजला आहे .

 दापोली शहरातील  मेहता पेट्रोल पंपावर खाजगी बसला आग लागली , यामध्ये  पंपावरील कर्मचारी राजू भुवड गंभीर भाजला 
आहे , मेहता पेट्रोलपंप  खासगी बसला  अचानक आग लागली मात्र  जी बी मेहता पेट्रोल पंप मालक आशीष मेहता , प्रसाद मेहता यांनी प्रसंगावधान राखत पेटती बस पेट्रोल पंपाच्या बाहेर घेऊन गेल्याने मोठा अनर्थ टळला, आणि दापोली वाचली ,  तात्काळ 

अग्निशामक दल  घटनास्थळी दाखल झाले  ,शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवीला जात आहे , 

पंपावर डिझेल भरण्यासाठी  आलेल्या खाजगी बसने अचानक पेट घेतला गाडी पेट घेतात आपला जीव वाचवण्यासाठी पंप आतील कर्मचारी सैरभैर झाले तसेच पंप आतील वाहन इतरत्र हलविण्यात आले परंतु गाडीने उग्र पेट घेण्याआधीच आशीष मेहता , प्रसाद मेहता या दोन बंधुनी मोठ्या हिमतीने पेटलेली गाडी पंपाच्या बाहेर काढले व तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले मात्र क्षणाचाही विलंब झाला असता तर पेट्रोल पंप व आजूबाजूच्या वस्तीला मोठा धोका निर्माण झाला असता पेट्रोल पंप मध्ये पेट्रोल ने भरलेला टँकर उभा होता तसेच पेट्रोल-डिझेल ने भरलेल्या दोन्ही टाक्या फुल होत्या पंप सुरू होते परंतु जी बी मेहता पेट्रोल पंपाचे मालक आशिष मेहता व प्रसाद मेहता या दोन्ही  बंधूंनी आपल्या जिवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत मोठ्या शिताफीने ही गाडी बाहेर काढून लोकांच्या जीविताला असलेला धोका टाळला आहे या दोन बंधने केलेल्या धाडसी कृत्यामुळे आज बाका प्रसंग टळला आहे, तसेच प्रसंगावधान राखत सुजय मेहता ऋषी मालू यानी फायर बॉल च्या सहायाने पेटता पम्प विजउन  होणारा मोठा अनर्थ टळला .

दापोली नगरपंचायतीचे नगरसेवक मंगेश राजपुरकर यांनी मोठ्या धाडसाने पेटत्या बसच्या खाली जाऊन झोपून गाडीचे नट ओपन केले त्यामुळे गाडी पुढे हलविण्यात मदत झाली नगरसेवक मंगेश राजपुरकर यांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे गाडी क्रमांक

Mh 09 cv 1269,  अमोल भुवड , मयूर मोहिते  या तरुणाने  गाड़ी विजविन्या मदत केली




Comments