बनावट नियुक्ती पत्राद्वारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

 रत्नागिरी:बनावट नियुक्ती पत्रक तयार करुन कनिष्ठ प्रशासक अधिकार्‍यांकडे हजर होण्यासाठी नेउन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सौरभ किशोर पवार (रा.केळवी, ता.राजापूर, जि.रत्नागिरी) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार 18 डिसेंबर रोजी दुपारी 11 वा.सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्याच्याविरोधात कनिष्ठ प्रशासक अधिकारी बालाजी विठ्ठलराव कलेटराव (47,रा.रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सौरभ पवार याने जिल्हा निवड समिती अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी यांचा बनावट शिक्का व स्वाक्षरी तसेच जिल्हा परिषद, रत्नागिरीचाही बनावट शिक्का व स्वाक्षरीव्दारे बनावट नियुक्ती पत्रक तयार केले. ते नियुक्ती पत्रक कनिष्ठ प्रशासक अधिकारी कलेटराव यांच्याकडेन नेउन हजर होण्यासाठी शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वांगणेकर करत आहेत.

Comments