जिल्हा जेष्ठ नागरिक समन्व्य सानियत्रण समितीचे गठन!!!
चिपळूण (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन सामाजिक व न्याय विभागाचे दिनांक 31ऑक्टोबर 2019 च्या शासन निर्णयानुसार जिल्हातील जेष्ठ नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करणे, आई -वडील व जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणसाठी शासनाने दिलेल्या आदेशाची जिल्हा स्तरावर प्रभावी तथा समन्वयीत अमलबजावणीसाठी आणि सल्ला देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जेष्ठ नागरिकांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील "जिल्हा जेष्ठ नागरिक समन्व्य सानियत्रण समिती "स्थापन करावयाच्या असून त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ही समिती गठीत करण्याचा निर्णय मा. जिल्हाधिकारी मा. लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या दालनात दिनांक 24फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या सभेत घेण्यात आला. या समितीत जिल्हास्तरावरील अधिकारी यांचे शिवाय जेष्ठ नागरिक संघांचे प्रतिनिधी म्हणून रत्नागिरी शहर शाखेचे अध्यक्ष सुभाष थरवळ व चिपळूण जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष उस्मान बांगी यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बाबतचे आदेश मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रत्नागिरी यांनी दिनांक 16 डिसेम्बर2020 रोजी निर्गमित केले आहेत.या नियुक्ती बाबत रत्नागिरी जिल्हा जेष्ठ नागरिक संघ समन्व्य समितीकडुन स्वागत करण्यात आले असून यामुळे जेष्ठ नागरिकांचे प्रश्न लवकर सुटण्यास मदत होइल अशी आशा व्यक्त करून मा जिल्हाधिकारी यांना धन्यवाद देण्यात आल्या आहेत. तसेच या नियुक्ती बद्दल जिल्हातील विविध जेष्ठ नागरिक संघांनी सुभाष थरवळ व उस्मान बांगी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment