रत्नागिरीत पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला
रत्नागिरी - शहरातील जुना माळनाका येथील लिमयेवाडी येथे राहणाऱ्या पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. पतीच्या चाकू हल्ल्यात पत्नी जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हल्लेखोर पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले अहे.
लिमयेवाडी धवल कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेवर तिच्या पतीने भर रस्त्यात चाकूहल्ला केला. महिलेच्या पोटात कांदा कापायचा सुरा खुपसून महिलेला जखमी केले आहे. महिलेची प्रकृती आता स्थिर असून जिल्हा रुग्णालयात अधिक उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग व शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. भरवस्तीत घडलेल्या या चाकू हल्ल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Comments
Post a Comment