हे काय? या मराठी अभिनेत्रीने केक खाण्याऐवजी लावला चेहरा आणि अंगाला

 

ओळखलंत का या अभिनेत्रीला?

'दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेतील ‘निशा’ आठवतेय का? राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली ही निशा, म्हणजेच मंजिरी पुपालाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ख्रिसमसच्या निमित्ताने मंजिरीने हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.

‘केक आणि सेलिब्रेशनचा सध्या माहौल असल्याने, तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी हा फोटो अतिशय योग्य वाटतोय’, असं म्हणत तिने हा फोटो पोस्ट केला. मंजिरीने तिच्या पूर्ण चेहऱ्याला आणि अंगाला हा केक लावला आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय. मंजिरीच्या या फोटोवर ‘भाडिपा’ फेम सारंग साठ्येनेही कमेंट केली आहे. ‘कॉलेजमध्ये प्रत्येक वाढदिवसाला मला असा केक फासला जायचा. कॉलेजमधली पोरं पैसे जमा करून केक आणायचे आणि तो चेहऱ्याला फासायचे’, अशी आठवण सारंगने सांगितली.


Comments