31 डिसेंम्बर ला दारू नको दूध प्या अभियान

  स्वयंसिद्धा समूह व  मातृभूमी   प्रतिष्ठानच्यावतीने 31 डिसेंबर रोजी दारू नको दूध प्या अभियानाची सुरुवात माहेर या अनाथाश्रमातील चाळीस विद्यार्थ्यासोबत करण्यात येत आहे.

       या उपक्रमात 31 डिसेंम्बर पार्टी चे पैसे वाचवून माहेर मधील  35 विद्यार्थ्यांना सकाळी जयविनायक मंदिर, जयगड किल्ला, गणपती पुळे मंदिर, आरे वारे, मस्यालय, भगवती किल्ला, भाट्ये बीच, संध्याकाळी बॉम्बे सेलिब्रेशन पॉइंट , रिलायन्स मॉल च्या वतीने दूध, डान्स व हेल्दी स्नॅक्स पार्टी चे आयोजन करण्यात आले आहे, स्वयंसिद्धा समूहात रत्नागिरीतील प्रत्येक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला आहेत.

       या उपक्रमासाठी राजेंद्र माने इंजिनिअरिंग कॉलेज च्या प्रबोधन शिक्षण संस्था अध्यक्ष नेहा माने यांनी बसेस ची व्यवस्था केली आहे तर श्री झापडेकर कुवारबाव यांनी दूध पार्टी साठी सहकार्य केले आहे,जयगड दर्शन साठी अनिल दाधिच व रेणुका दाधिच यांनी मनोरंजन सौय सामाजिक भावनेतून केली आहे. यावेळी संध्याकाळी 7 वाजता दूध पार्टी मध्ये सहभागी होण्यासाठी 9422050977,02352355366 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन स्वयंसिद्धा  च्या पूर्वा किणे व प्राजक्ता किणे व मातृभूमी प्रतिष्ठान चे प्रविण किणे यांनी केले आहे

Comments