नवनव्या वर्षांत नौकांची 12 नॉटिकल मैलांचा आत मासेमारीसाठी बंदी

 रत्नागिरी:पर्ससीन नेट नौकांची मासेमारी 1 जानेवारीपासून 12 नॉटिकल मैलांबाहेर सुरू होणार असल्याचे मच्छीमार नेते नासीर वाघू यांनी सांगितले. 12 नॉटिकल मैलांबाहेर केंद्र शासनाचे सागरी क्षेत्र आहे. या सागरी क्षेत्रात जाण्यासाठी राज्य शासनाच्या अखत्यारितील समुद्रातील मार्ग आणि मासळी उतरविण्यासाठी बंदरे वापरली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.12 नॉटिकल मैलांच्या आत राज्य शासनाच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रातील पर्ससीन नेट मासेमारी 1 जानेवारीपासून बंद होत आहे. 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत चार महिन्यांचा कालावधी पर्ससीन नेट मासेमारीला मिळाला.परंतु, यंदाच्या मोसमातही अपेक्षित मासेमारी उत्पन्न मिळाले नाही. त्यात आता राज्याच्या समुद्री क्षेत्रातील मासेमारी बंद झाल्यानंतर 1 जानेवारीपासून केंद्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रात मासेमारी करून मागील तोटा भरून निघेल, अशी आशाही मच्छीमार नेते वाघू यांनी व्यक्त केली. पर्ससीन नेट नौकांना केंद्र शासनाच्या नियंत्रणातील समुद्री क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी राज्याच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रमार्गातून जावे लागणार आहे. त्याचबरोबर पकडलेली मासळी उतरविण्यासाठी त्याच मार्गाने राज्याच्या अधिकार क्षेत्रातील बंदरांवर यावे लागणार आहे. या संदर्भातील येणार्‍या अडचणींची माहिती बंदर व मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांना देण्यात आली असल्याची माहितीही मच्छीमार नेते वाघू यांनी दिली.सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंतचा चार महिन्यांचा मासेमारी हंगाम वातावरणातील प्रतिकुल परिस्थितीमुळे तोट्याचा गेला आहे.

1जानेवारीपासून केंद्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील समुद्री क्षेत्रात मासेमारी करून मागील तोटा भरून निघू शकेल.

Comments