SBI क्रेडिट कार्ड हरवल्यामुळे चिंतेत आहात? ब्लॉक करण्यासाठी वापरा हे 4 मार्ग


देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या SBIकडून ग्राहकांच्या सोयीसाठी विविध सेवा देण्यात आल्या आहेत. क्रेडिट कार्ड संबंधितही अनेक सेवा बँक पुरवते. दरम्यान तुमच्याकडून क्रेडिट कार्ड हरवले किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्ही विसरून आला असाल तर ते ब्लॉक करणे गरजेचे आहे.

क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे काम पूर्ण करू शकता.बँकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून किंवा तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून sms करूनही तुम्हाला हे काम करत येईल. 

SBI च्या वेबसाईट किंवा अ‍ॅप वरून देखील  क्रेडिट कार्ड ब्लॉक करता येईल.SMS च्या माध्यमातून- BLOCK XXXX (क्रेडिट कार्डचे शेवटचे 4 डिजिट) असा मेसेज तुम्हाला 5676791 या क्रमांकावर करावा लागले. हा एसएमएस करण्यासाठी केवळ रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकाचा वापर करा

-sbicard.com या वेबसाइटवर जाऊन तुमच्या अकाउंटवर लॉग इन करा

-रिक्वेस्ट टॅबमध्ये जाऊन 'Report Lost/Stolen Card' वर क्लिक करा

-हरवलेल्या कार्डच्या क्रमांकावर क्लिक करा

-कार्ड रिइश्यू करण्यासाठी 'reissue card' कार्डवर क्लिक करा, अशाप्रकारे तुमचं कार्ड ब्लॉक होईल

मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून-

-SBI App मध्ये लॉग इन केल्यानंतर 'मेन्यू'मध्ये जा

-त्यामध्ये सर्व्हिस रिक्वेस्टमध्ये जाऊन 'Report Lost/Stolen'वर क्लिक करा

-कार्ड क्रमांक सिलेक्ट करून सबमिट करा, तुमचं कार्ड ब्लॉक होईल

तुम्ही वरीलपैकी कोणत्याही मार्गाने कार्ड ब्लॉक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मेल आयडी आणि मोबाइल क्रमाकांवर कार्ड ब्लॉक केल्याचे कन्फर्मेशन येईल. त्यामुळे तुम्हाला कार्ड ब्लॉक झाले आहे की नाही ते कळेल.

Comments