शाळा बेनी बु ll नं 4 ची अनुश्री केळकर शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत


राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांच्यातील गुणवत्तेला वाव मिळाला, स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी यादृष्टीने महाराष्ट्र शासना मार्फत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत जि. प. प्राथमिक शाळा बेनी बुद्रुक नं 4 गुरववाडी,  तालुका लांजा शाळेने घवघवीत यश संपादन केले.

या शाळेची इयत्ता पाचवी ची  विद्यार्थिनी कु. अनुश्री नितेश केळकर ही  पूर्व उच्च प्राथमिक  शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत जिल्ह्यात 103 व  लांजा तालुक्यात 5 वी आली. 

सर्वसामान्य परिस्थिती असूनही अनुश्री ने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर हे यश खेचून आणले आहे व आपल्या शाळेचे, गावाचे तसेच आपल्या पालकांचे नाव उज्वल केले आहे. याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून तिचे व तिच्या पालकांचे  कौतुक करण्यात येत आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेताना शाळेमार्फत नियमित शाळेच्या वेळा व्यतिरिक्त जादा तास घेण्यात आले. सराव करून घेताना जवळपास 40 हुन अधिक  प्रश्नपत्रिकांचा सराव घेण्यात आला. यावेळी तिला शाळेतील शिक्षक श्री नितीन मोहिते व श्री अशोक बांगर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तिचे माजी शिक्षक  श्री अनिल मुरावणे यांचा देखील तिच्या यशात महत्वाचा वाटा आहे. 

अनुश्री केळकर हिच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील उल्लेखनीय यशाबद्दल लांजा पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी मा.सोपनूर साहेब, विस्तार अधिकारी मा. विजयकुमार बंडगर साहेब, केंद्र प्रमुख मा. पटेल सर,गावचे सरपंच मा. संतोष धामणे,  शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समिती, सर्व बेनी बुद्रुक ग्रामस्थ व पालक यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments