लवकरच बंद होणार Google Chrome
जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी गुगल (Google) आपल्या ग्राहकांसाठी नवीन अपडेट घेऊन येत असते. आता कंपनीने गुगल क्रोम अॅप (Google Chrome App) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी 2021 मध्ये गुगल क्रोमची सेवा बंद होणार आहे. गुगल कीप अॅपसाठी (Google Keep App) गुगल क्रोम बंद केले जाणार आहे. आपल्या सपोर्ट पेजवर कंपनीने यासंदर्भात माहिती दिली आहे.
दरम्यान कंपनीकडून गूगल क्रोम लॉक स्क्रीनचा अॅक्सेस देखील (Google Chrome Lock Screen) बंद केला जाणार आहे. गुगलने 2008 मध्ये आपल्या युजर्ससाठी सर्च ब्राउझर म्हणून गुगल क्रोम बाजारात आणलं होतं. गुगल क्रोम सध्या विंडोज, लिनक्स आणि आयओएस या सिस्टीमवरदेखील चालत आहेत. त्यानंतर मागील 12 वर्षांत यामध्ये विविध बदल करण्यात आले होते. परंतु युजर्सचा कमी झालेला प्रतिसाद पाहून गुगलने क्रोम अपची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
याचबरोबर कंपनी गुगल कीपचे ऑफलाईन अक्सेस देखील बंद करणार आहे. याआधी एकदा क्लिक करून युजर्स कीप अॅपचा वापर करू शकत होते. परंतु आता युजर्स क्रोमवर गुगल कीप वेब वर्जनला बुकमार्क करू शकतात. यासाठी त्यांना अॅड्रेस बारच्या उजव्या बाजूला स्टारवर क्लिक करावं लागणार आहे त्यानंतर गुगल बुकमार्क करावं लागेल.
त्याचबरोबर गुगल आपल्या कीप युजर्सना वेब व्हर्जनचा वापर करण्यासाठी देखील प्रोत्साहित करत आहेत. गूगल कीपवर क्रोम 86 युजर्स ब्राउझरवर Google च्या मायग्रेशनची ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण करू शकतात. गुगल कीप ही सुविधा गुगल आपल्या युजर्ससाठी नोट्स तयार करण्यासाठी देत आहे. यामध्ये युजर्स आपल्या महत्त्त्वाच्या गोष्टींची नोंद करू शकतात. त्यामुळे भविष्यात या नोट्सचा वापर युजर्सला करता येऊ शकतो.
कीप क्रोम डेस्कटॉप शॉर्टकटला शॉर्टकट लॉन्चरमध्ये (Shortcut Launcher) रुपांतरित करण्यात येणार आहे. यामध्ये डेस्कटॉप शॉर्टकटवर क्लिक केल्यास ते थेट गुगल कीपवर घेऊन जाणार आहे. नुकतेच गुगलने आपल्या गुगल किपच्या लोगोमध्येदेखील बदल केले होते.
कंपनीच्या गूगल वर्कस्पेस रिब्रँडिंगचा तो एक भाग होता. नवीन लोगो एका बल्बसारखा दिसत असून गूगल कीप यूजर्सना आधीपासूनच हा लोगो दिसत आहे. परंतु हा लोगो अजूनपर्यंत मोबाईल अॅपमध्ये लागू करण्यात आलेला नाही.

Comments
Post a Comment