'वणवा मुक्त ' गावाला विकासासाठी जादा निधी देणार : आ.निकम
अहवाल पं.स. ला सादर करणार असल्याचे आ.शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली काल शुक्रवारी झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.पर्यावरणप्रेमी , माजी सभापती शौकत मुकादम यांची ही संकल्पना असून ती आता मूर्त स्वरुप घेत आहे.
प्रांत कार्यालयात झालेल्या या बैठकीला उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार,तहसिलदार जयराज सूर्यवंशी,माजी सभापती शौकत मुकादम , उपसभापती पांडुरंग माळी , पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील,पं.स.कृषी अधिकारी संजय जानवलकर , मानद वन्यजीव रक्षक भाऊ काटदरे , ग्लोबल टुरिझमचे रामशेठ रेडीज,निलेश बापट , प्रकाश उर्फ बापू काणे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते , वनविभागचे अधिकारी व कृषी विभागचे अधिकारी,महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.वणवा लावणे कायद्याने गुन्हा आहे.
त्यासाठी शिक्षेची तरतूद असूनही मोठ्या प्रमाणावर वणवे लावले जात आहेत.या शापातून सर्व गावांची सुटका व्हावी,यासाठी चिपळूण तालुक्यातील निसर्गप्रेमींनी एक येऊन वणवा मुक्त कोंकण समिती स्थापन केली आहे.आता शासनस्तरावर ही मोहीम पंचायत समितीच्या माध्यमातून राबविली जाणार आहे.
गटविकास अधिकारी याबाबतचे लेखी आदेश ग्रामपंचायतीला बजावणार आहेत.गावातील १० प्रतिष्ठीत ग्रामस्थांची समिती ग्रामसभेत होणार असून बीट पोलीस अधिकारी,तलाठी ग्रामसेवक,कृषी सहाय्यक पोलीस पाटील,वनपाल,वनरक्षक हे पदसिद्ध सदस्य राहणार आहेत

Comments
Post a Comment