राजापूर पिकअप शेडवर सुरेश प्रभू यांचे नाव पुन्हा एकदा टाकण्यात यावे

 सौ.कल्याणी रहाटे यांची मागणी


रत्नागिरी प्रतिनिधी:-


राजापूर शहरातील जवाहर चौक येथील एसटी पिकप शेडवर मा.सुरेश प्रभू यांचे नाव पुन्हा एकदा घालण्यात यावे अशी मागणी राजापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष व शिवसेनेच्या कार्यकर्त्यां सौ.कल्याणी रहाटे यांनी केली आहे.

राजापूर एसटी पिकप शेडच्या उभारणीसाठी सुरेश प्रभू यांनी निधी दिला होता. मात्र सध्या या पिकअप शेड वरचा रंग उडून गेला आहे. राजापूर नगर परिषदेकडे रंग कामासाठी पैसे उपलब्ध नाहीत काय असा प्रश्न सौ.कल्याणी रहाटे यांनी उपस्थित केला आहे. राजापूर शहरात येणा-या ग्रामीण भागातील असंख्य ग्रामस्थांना या पिकअप शेडचा उपयोग होतो. या पिकअप शेडवर सुरेश प्रभू यांचे नाव होते. मात्र हे नाव घालवण्याचा कट देखील नगर परिषदेचा नाही ना असाही सवाल सौ.कल्याणी रहाटे यांनी उपस्थीत केला आहे.

Comments