कडवई जि. प. गटात दीपावली निमित्त घेण्यात आलेल्या 'भव्य किल्ला बांधणी' स्पर्धेचा निकाल जाहीर

 


संगमेश्वर तालुक्यातील कडवई जि. प. गटात भारतीय जनता पक्षाच्या वतीने  दीपावली निमित्त 'भव्य किल्ला बांधणी' स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कडवई जि. प. गटातील एकूण 17 बाल किल्लेदारांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे ऑनलाइन परीक्षण करण्यात आले.

या स्पर्धेत गोळवलीच्या कु. राज दीपक आमकर आणि कु. सुषांग चंद्रकांत आमकर या जोडीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. ही स्पर्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांना समारंभपूर्वक बक्षीस वितरण करण्यात येईल. 

याशिवाय पहिल्या 7 क्रमांकांना किल्ले पन्हाळा येथे एक दिवसीय अभ्यास सहलीच्या माध्यामातून छत्रपती शिवाजी महाराज, वीर शिवा काशिद, आणि पावनखिंडीत धारातिर्थी पडलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या इतिहासाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे. 

यातील नाष्टा, जेवण आणि प्रवास खर्च डॉ.अमित ताठरे स्वतः करणार आहेत. याव्यतिरिक्त सर्व किल्लेदारांचे किल्ले BJP4Sangameshwar या Facebook page वर पाहण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. प्रथम क्रमांक कु. राज दीपक आमकर, कु. सुषांग चंद्रकांत आमकर (गोळवली), द्वितीय क्रमांक  कु. शुभम सुभाष बसवणकर, कु. ओम सुरेश बसवणकर (धामणी, यादववाडी), तृतीय क्रमांक (विभागून) कु. सोहम संदीप सावरटकर (कडवई, कुंभारवाडी), कु. यश केशव आमकर, कु. श्रेयस दिलीप आमकर (मयुरमाळ, आमकरवाडी, गोळवली), उत्तेजनार्थ कु. सार्थक बडद, कु. संदेश साळवी (कडवई, तांबडवाडी), कु. सिद्धेश तुकाराम जाधव, कु. यश मंगेश जाधव (मु.पो. कडवई, तांबडवाडी), कु. तुलसीदास शिवाजी शिर्के (कुंभारखाणी बुद्रुक),  कु. छकुली सुभाष किंजळकर (कडवई किंजळकर वाडी).

Comments