रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील श्रमिक किसान सेवा समितीच्या लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने उद्या गुरुवार दिनांक: २६ नोव्हेंबर २०२० रोजी

रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील श्रमिक किसान सेवा समितीच्या लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने उद्या गुरुवार दिनांक: २६ नोव्हेंबर २०२० रोजी

सकाळी ८ ते ११ वा. पर्यंत   क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले सत्यशोधक सांस्कृतिक सभागृह,  लोकनेते शामरावजी पेजे विद्यानगरी 

शिवार आंबेरे, ता. जि. रत्नागिरी. या ठिकाणी

 भारतीय संविधान दिन                      

                 आणि

 राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिनाच्या निमित्ताने  भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षक मा. नुरखाँ  पठाण  हे प्रमुख वक्ते असणार आहेत।

      या कार्यक्रमात बहुजन चळवळीतील अग्रगण्य नेते मा. राजेंद्र आयरे, प्रिती पटेल जिल्हा व्यवस्थापक शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि., मा. नंदकुमार मोहिते संस्थापक अध्यक्ष-        'श्रमिक किसान सेवा समिती' माजी सदस्य- जि. प. रत्नागिरी, मा. मधुकर थुळ सचिव- श्रमिक किसान समिती तथा प्राचार्य - श्रमिक विद्यालय आणि लोकनेते शामरावजी पेजे ( कला, वाणिज्य आणि विज्ञान) कनिष्ठ महाविद्यालय, प्रा. श्री. राकेश आंबेकर प्र.प्राचार्य  लोकनेते शामरावजी पेजे (कला, वाणिज्य आणि विज्ञान) वरिष्ठ महाविद्यालय, शिवार आंबेरे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। 

        हे व्याख्यान ऐकण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स  इत्यादी नियमांचे पालन  करून कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रम अधिकारी प्रा. नितेश केळकर आणि प्रा कल्पना मेस्त्री यांनी केले आहे।


Comments