जैतापूरच्या ग्रामस्थांना मोबाईलची रेंज शोधावी लागतेय, आकर्षक ऑफर्स काय कामाच्या? जैतापूर ग्रामपंचायत सदस्य सर्फराज काझी यांची तिव्र नाराजी

 रत्नागिरी प्रतिनिधी:-

जैतापूर व आजुबाजुच्या गावातील ग्रामस्थांना मोबाईलची रेंज शोधावी लागतेय. याचा मनस्ताप मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतोय. अन्य खाजगी कंपन्यांच्या सीम कार्ड्सना रेंज मिळत नाही. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ तिव्र नाराज आहेत. यासंदर्भात येथील ग्रामपंचायत सदस्य सर्फराज काझी यांनी देखील तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. खाजगी कंपन्यांच्या मोबाईल नेटवर्क पेक्षा जुने बीएसएनएल मोबाईल नेटवर्कच चांगले होते अशी प्रतिक्रिया सर्फराज काझी यांनी व्यक्त केली आहे. 

जैतापूर परिसरात सध्या 2G, 3G  नेटवर्क मिळत नाहि. मोबाईलवरुन दुस-या ठिकाणी संपर्क साधता येत नाही. नेटवर्क नसल्यामुळे व्हॉट्स अप देखील चालत नाही. नेटवर्क शोधण्यासाठी सतत ठिकाणे बदलत रहावी लागतात. एकुणच ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात तालुका प्रशासनाने देखील लक्ष घालावे व मोबाईल नेटवर्क ची समस्या सोडवावी अशी मागणी सर्फराज काझी यांनी केली आहे.

Comments