दोन वर्षानंतर सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र ते नवीन वसाहतमधील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार!

सावर्डे:मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान गेल्या दोन वर्षांपूर्वी सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र ते नवीन वसाहत मधील पाईपलाईन फुटल्याने येथील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. मात्र येथील ग्रामस्थांनी आवाज उठवल्यानंतर चेतक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच येथील ग्रामस्थांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरच सोडवू अशी ग्वाही दिली आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र ते नवीन वसाहत मधील एक किलोमीटर अंतरावरील पाईपलाईन पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने येथील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नाकडे गेल्या दोन वर्षांपासून दुर्लक्ष होत होते. मात्र, ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नुकतेच चेतक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येथील ग्रामस्थांची भेट चार दिवसात हा प्रश्न सोडवू अन्यथा टॅंकरने पाणी पुरवठा केला जाईल, अशी ग्वाही दिली.यावेळी सावर्डे ग्रामपंचायतीचे सदस्य सूर्यकांत चव्हाण, ग्रामीण पाणी पुरवठा अध्यक्ष प्रदीप चव्हाण, मोहमद काझी, रतन कुरेशी, वहिदा शेखासन, शब्बीर खलपे, सोहेल बटे, सुलतान खलपे, नूर मोडक, मुमताज शेख, सतीश जाधव, शामदास वैष्णव, सलीम लंबाडे, हसीना बटे आदी उपस्थित होते.


Comments