देवरूखात तरूणीचा मृतदेह सापडला

 देवरुख : प्रतिनिधी 

वडीलांनी मोबाईल काढून घेतल्याचा राग मनात धरून देवरूखमधील पुजा हेमंत शिंदे (वय- 19) या तरूणीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3.30 वा. उघडकीस आली. या घटनेमुळे देवरूख शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

           याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, देवरूख केशवसृष्ट्री येथील चोरपऱ्यामधे दुपारी तरूणीचा मृतदेह सापडल्याची बातमी देवरूख शहरात पसरताच अनेकांनी चोरपऱ्याच्या दिशेने धाव घेतली. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी जावून पंचनामा केला. यावेळी तरूणीची ओळख पटवण्यात पोलीसांना यश आले. पुजा हेमंत शिंदे (१९ -  देवरुख) असे युवतीचे नाव असून तिने यावर्षी बारावीची परिक्षा दिली होती. कुटुंबियांनी तिचा मृतदेह पाहताच तिला ओळखले. पोलीसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह विच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला. पोलीसांनी पुजा हिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतरच नेमके खरे कारण समजू शकणार आहे. देवरूख पोलीसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. पो. हे. काँ. उर्मिला शेडे अधिक तपास करीत आहेत.


Comments