रत्नागिरीतील व्यापाराला खंडणीसाठी धमकी; संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल


काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील मोबाईल व्यावसायिकाला खंडणीवरून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा याच भागातील हॉटेल व्यावसायिकांकडून ५ हजार रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 

आठवडा बाजारामधील हॉटेल गणेशच्या मालकांना दोघांनी धमकी देत आठवड्याला पाच हजारांच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात या दुकलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments