अर्णबच्या अटकेनंतर कंगना राणौतचा शिवसेनेवर हल्लाबोल

 


रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे सरकारने ही सुडबुद्धीने केलेली कारवाई आहे असा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी ही अटक केली आहे. आज सकाळी अर्णब यांना वरळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. कलम ३०६ अंतर्गत अर्णबवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. याबाबत कंगनानं ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत शिवसेनेचा सोनिया सेना म्हणून उल्लेख केला आहे. कंगना म्हणाली की, अर्णब गोस्वामींना घरात घुसून पोलिसांनी मारलं, अटक केली, किती घरं तोडणार?, किती जणांचा गळा दाबणार? कोणाकोणाचे आवाज बंद करणार? सोनिया सेना किती जणांची तोंड बंद करणार? असा सवाल कंगनानं उपस्थित केला आहे

तसेच आमच्याआधी किती शहिदांचे गळे कापले, त्यांना लटकवलं गेले आहे. एक आवाज बंद केला तर अनेक आवाज उभे राहतील, पेग्विंन बोलल्यानं राग का येतो? पेग्विंनसारखे दिसता तर बोलणारच, पप्पू सेना म्हटल्यावर राग येतो, तुम्ही सोनिया सेनाच आहात अशी टीका अभिनेत्री कंगना राणौतनं केली आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्र कायद्याचं पालन करणारं राज्य आहे, सबळ पुरावे असतील तर पोलीस कारवाई करू शकतात, ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून कोणावरही सुडबुद्धीने कारवाई केली नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.


Comments