बुरंबाड, कोंडिवरे परिसरात बिबट्याचा संचार
आरवली:बुरंबाड, कोंडिवरे परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. बुरंबाड आणि कोंडिवरे परिसरात सायंकाळी ७-८ वाजताच्या सुमारास बिबट्याचे दर्शन अनेकांना झाले आहे. काही महिन्यांपूर्वी कोंडिवरे येथे ब्लॅक पँथर या बिबट्याचे तीन ते चार वेळा दर्शन झाले होते. आता कोंडिवरे आणि बुरंबाड परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Comments
Post a Comment