लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयात लोकनेते शामरावजी पेजे यांना अभिवादन


लोकनेते शामरावजी पेजे यांचा आज दिनांक 16 नोव्हेंबर हा स्मृतिदिन त्यानिमित्ताने शिवार आंबेरे येथील श्रमिक किसान सेवा समितीचे श्रमिक विद्यालय आणि लोकनेते शामरावजी पेजे (कला वाणिज्य विज्ञान) कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात आज सकाळी ठीक आठ वाजता लोकनेते शामरावजी पेजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी श्रमिक किसान सेवा समितीचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय नंदकुमार मोहिते, श्रमिक किसान  सेवा समितीचे सचिव आणि प्राचार्य मधुकर थुळ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक नितेश केळकर, सहाय्यक शिक्षक दिवाकर तरळ, प्राध्यापिका शालिनी चांदले, सहाय्यक शिक्षिका स्नेहल भडेकर मॅडम, तुकाराम लाखण, सचिन बावकर, समीर पेजे, शिपाई रामचंद्र ठीकरे, गोवर्धन मोहिते आदी मान्यवर आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी  उपस्थित होते. 

या प्रसंगी बोलताना श्रमिक किसान सेवा समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते यांनी अण्णासाहेब तथा लोकनेते शामरावजी पेजे यांच्या बहुजनांच्या कल्याणा करीता केलेल्या कार्याला उजाळा दिला। तसेच कुणबी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले.



Comments