आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नाने ठाकूर विद्या मंदीर शाळेतील फी ५० टक्के माफ
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे बऱ्याच पालकांचे नोकरी, व्यवसाय सद्या बंद आहेत. यातच ठाकूर विद्यामंदिर शाळेच्या प्रशासनाने फी भरण्यासाठी पालकांना फोनद्वारे तगादा लावला होता . ही बाब मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना समजताच त्यांनी तात्काळ शाळेच्या प्रशासनासोबत बैठक घेऊन सर्व विद्यार्थ्याची फी ५०% माफ करण्यात यश मिळवले .
याबाबत सर्व पालकांनी आमदार प्रकाश सुर्वे यांचे आभार मानले. यावेळी शाखाप्रमुख अशोक परब, महिला शाखासंघटक कांचन सार्दळ, माजी उपविभागप्रमुख मनोहर देसाईसहित पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment