भारतीय जनता पार्टी राजापूर कडून राजापूर महावितरण कार्यालयासमोर आज वाढीव बिज संदर्भात आंदोलन करण्यात आले.

 


भारतीय जनता पार्टी राजापूर कडून राजापूर महावितरण  कार्यालयासमोर आज वाढीव  बिज  संदर्भात आंदोलन करण्यात आले. तसेच वाढीव बिले जाळून टाकण्यात आली व सरकारचा निषेध करण्यात आले. अनेक घोषणा देऊन निषेद करण्यात आले. राजापूर तालुक्यात अनेक समस्या विजेच्या असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.पण उपअभियंता आल्याशिवाय आम्ही हटनार नाही अशी भूमिका आदोंलकांनी घेतली होती. वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क करून यावर कार्यवाही केली जाईल असे दूरध्वनीवरून सांगण्यात आले.तालुक्यासह महाराष्ट्र अनेक समस्या व वाढीव बिले रद्द करण्याचे नंतर निवेदन देण्यात आले .अनेक भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्षसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Comments