नुकसानभरपाई देण्याबाबत शासनाकडून कार्यवाही सुरू


निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या मोठ्या प्रमाणातील नुकसानीची भरपाई देण्याबाबत शासनाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. संबंधित नुकसानीबाबतचे पंचनामे व अनुदान वाटप करण्याचे काम शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून झाले आहे. मात्र, अद्यापही काही नुकसानग्रस्त नागरिक व शेतकरीयांचे पंचनामे व अनुदान वाटप नुकसानीसंदर्भात आक्षेप व तक्रारी असल्याचे समजते. 

त्यानुसार पुढील कार्यवाहीत अडचणी व तक्रारी होऊ नयेत म्हणून संबंधित नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांनी आपापल्या तक्रारी व आक्षेपशासनाच्या निदर्शनास आणावेत. वादळामुळे पीक, घरे, गोठे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्वांबाबत संबंधित नागरिक व शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी शासनापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments