ऊक्शी मोहल्ला ते रेल्वे स्टेशन रस्त्याची काँग्रेसने जबाबदारी घेतली - अशोकराव जाधव
ऊक्शी मोहल्ला ते ऊक्शी रेल्वे स्टेशन रस्ता खडीकरण डांबरी करण व सुनियोनीत गटारे या साठी शासनाकडे निधी नाही असे कारण सांगुन स्थानिक लोकप्रतिनिधी जानून बुजून प्रशासनाला वेढीला धरून रस्ता होऊ देत नाहीत.
रेल्वे स्टेशन ते ऊक्शी मोहल्ला या रस्तावरची वाहतूक पाहता शेकडो लोक रेल्वेने प्रवास करणारे ये जा करतात , अॅटो . तसेच लगेज ने आण करण्या साठी रस्ता सुस्थितीत असणे आवश्यक आहे तेंव्हा मि रमजान गोलंदाज सारख्या जेष्ठ पत्रकारांना आमरण ऊपोषणाचा निर्णय कुचकामी लोकप्रतिनिधी आणि प्रशासना मुळे नाइलाजाने घ्यावा लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने मी अशोकराव जाधव गोलंदाज आणि समस्त ऊक्शी गावातील ग्रामस्थांना सांगू इच्छीतो की ही आपली रस्ताची समस्या मा अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री यांचे निदर्शणास आणून लागणारा निधी मंजूर करून आणणार असे सांगत आहे.
यासाठी सदर रस्ताचे इस्टिमेट व प्रस्ताव सार्वजनीक बांधकाम विभाग अगर जिल्हा परिषद कडे पाढविला असेल तर त्याची प्रत गोलंदाज यानी द्यावी ही विनंती कॉंग्रेसच्या वतीने करीत आहोत . गोलंदाज जी आपण आम्हाला या ही पेक्षा मोठी सामाजीक कामे करण्या साठी हवे आहात. आपण गावाच्या विकासासाठी ज्या तळमळीने काम करत आहात त्याचा आम्हा काँग्रेस जनानां अभिमानच आहे. आम्ही आपल्या पाठीशी आहोत.
आपला- अशोकराव जाधव , ऊपाध्यक्ष , प्रवक्ता रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस , निरीक्षक चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ .

Comments
Post a Comment