डीजीके कला शाखेत सुप्रिया देसाई, गौरव मुळ्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी
मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेचा भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100% लागला .महाविद्यालयाची स्टुडंट ऑफ द इअर सुप्रिया देसाई ही 94% गुण मिळवून महाविद्यालयात पहिली आली आहे तिचे तीन युनिट भूगोल व तीन युनिट इतिहास असे विषय होते.तिला भूगोल विभाग प्रमुख प्रा ऋतुजा भोवड व इतिहास विभाग प्रमुख प्रा रिया बंडबे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच मराठी या विषयामध्ये 72% गुण मिळवून गौरव मुळ्ये प्रथम आला आहे.त्याला मराठी विभाग प्रमुख प्रा अनन्या धुंदूर यांनी मार्गदर्शन केले.गौरव याला संस्थेचे सहसचिव विनय परांजपे यांनी ठेवलेले कै एन वाय कुलकर्णी पारितोषिक रुपये 1000/- मिळाले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे ,संस्थेचे सचिव सुनिल उर्फ दादा वणजू ,प्रभारी प्राचार्य सीएमए प्रा उदय बोडस, सर्व प्राध्यापक वर्ग व सर्व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.

Comments
Post a Comment