वीजमिटर हटाव मोहिमेस कडवई पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद, महावितरण कंपनीचा निषेध

 


लॉकडाऊन काळात महावितरण कंपनीकडून ग्राहकांना अवाजवी वीजबिल आकारून ग्राहकांची पिळवणूक करण्यात आली होती. या विरोधात महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या वतीने अनेक आंदोलने छेडण्यात आली.

मात्र महावितरण कंपनीकडून यावर कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. याउलट वीजबिल भरून कंपनीला सहकार्य करावे अशा आशयाची पत्रे पाठवून ग्राहकांची चेष्टा करण्यात आली. यानंतर मात्र ग्राहक चांगलेच संतापले .आणि महावितरण कंपनीची वीजच नको असा पवित्रा जिल्हाभरात घेण्यात आला आहे. 

यासाठी कंपनीने आपले वीजमीटर काढून घ्यावेत व मागील अनेक वर्षांपासून महावितरण कंपनीचे विजखांब व वाहिन्या ज्या जनतेच्या जागेतून अवैधरित्या जात आहेत त्याचे भाडे व नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाची पत्रे कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेस कडवई पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पत्र देण्यासाठी शेकडो ग्राहक पुढे सरसावत आहेत .

लाँकडाऊन काळात आलेली वाढीव व अवाजवी वीजबिल माफ व्हावीत कारण या काळात जनतेचा उदरनिर्वाह चालणे मुश्किल झाले आहे .महावितरण कम्पानिकडून अशाही परिस्थिती रिडींग न घेता चुकीच्या पद्धतीने वीज बिल आकारली गेली असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे .

तरी निदान या तीन महिन्याची वीजबिल माफ व्हावित अन्यथा महावितरण कम्पानि च्या स्थापनेपासून ज्यांच्या जमिनीतून महावितरणचे विजखांब व विजवाहिन्या जात आहेत त्यांना कम्पनीने त्याचे भाडे व झालेली नुकसानभरपाई देणे कायद्यांने बंधनकारक असल्याने ते मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिवेबन्द आंदोलन विजबिलांची होळी तसेच आमरण उपोषण अशी अनेक आंदोलने घेण्यात आली .

यानंतर जिल्हाविशेष पोलीस दल रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांच्या मध्यस्थीनंतर महावितरण कम्पानिकडून सकारात्मक कार्यवाहीची हमी देण्यात आली होती . मात्र त्यानंतर पंधरा दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतरही ठोस निर्णय झाला नाही . याउलट ग्राहकानाच वीजबिल भरण्यासाठी विनंती करणारी पत्र देण्यात आली .

महावितरणच्या या गांधीगिरीनंतर ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली असून ग्राहकानि महावितरण कंपनीला आपले विजमिटर काढून न्यावेत व आम्हाला जागेचे भाडे व नुकसानभरपाई ध्यावी अशी पत्रे देण्यास सुरुवात केली आहे . नुकतीच कडवई येथे या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी एक बैठक घेण्यात आली .

या बैठकित कडवईचे माजी सरपंच धोंडू किंजळकर यांच्या पत्राने या मोहिमेची सुरवात करण्यात आली .या मोहिमेस कडवई पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोनच दिवसात शेकडी पत्र जितेंद्र चव्हाण यांना देण्यात आली आहेत . 

या मोहिमेची व्याप्ती जिल्हाभरात वाढवणार असून महावितरणला जोरदार झटका देणार असून प्रसंगी हा विषय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालायात जाण्याची पूर्ण तयारी असल्याचे चव्हाण यांनी सांगितले .योग्य न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच चालू ठेवणार असल्याचे ते म्हणाले .

Comments