कर्जाचे आमिष दाखवून सव्वा लाखांची फसवणूक

 रत्नागिरी:आदित्य बिर्ला फायनान्स मुंबई कंपनीकडून 2लाख रुपयांचे कर्ज देण्याची फोनवरून बतावणी करत एकाची 1 लाख 25 हजार 460 रुपयांची फसवणूक केल्याची घटना 10नोव्हेंबर ते 21नोव्हेंबर 2020 या कालावधीत घडली आहे. रितेश दीनानाथ पांडे आणि संजीव या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात छगन मनोहर कुंभार (34, रा. कुवारबाव, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.



Comments