रत्नागिरीतील नळपाणी योजनेत नियमबाह्य काम केल्यास जाब विचारणार; आलिमवाडी येथील जमिनीचा दर जिल्हा स्तरीय समिती ठरवणार
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहीती
रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने नळ पाणी योजनेच्या कामात नियमबाह्य काम आढळून आल्यास निश्चितच प्रशासनाला जाब विचारणार. आलिमवाडी येथील जमीन खरेदी प्रकरणात जमिनिची किंमत ठरवीण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती ठरवणार आहेत. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. रस्ते खदाईबाबत ३ समित्या नेमण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत त्याची जबाबदारी ठेकेदाराचीच राहिल. रस्त्यांच्या डांबरीकारणासाठी पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात आला असल्याची माहीती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Comments
Post a Comment