संगमेश्वर ट्रॉमा केअर सेंटरच्या विविध समस्यांबाबत आमदार शेखर निकम यांचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन
संगमेश्वर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तालुक्यातील जनता उपचाराकरिता येत असते. परंतु तेथे वैद्यकीय अधिकारी व इतर पदे रिक्त असल्यामुळे येथील जनता सोयी सुविधांपासून वंचित रहात आहे. रिक्त पदांअभावी एक्सरे मशीन,वॉटर कनेक्शन, यूएसजी मशीन, रेडिओलॉजिस्ट, इन्व्हर्टर, जनरेटर ही अद्यावत मशिनरी धूळ खात पडली असून नियमित वापर नसल्याने नादुरुस्त झाली आहेत.
मागील अर्थ संकल्पिय अधिवेशनात हा मुद्दा आमदार शेखर निकम यांनी उपस्थित केला होता. परंतु रिक्तपदे भरली गेली नसल्याने हा विषय प्रलंबित राहिला. लवकरात लवकर जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळावा तसेच संगमेश्वर ट्रॉमा केअर सेंटर साठी अद्यावत रुग्णवाहिका आणि कर्मचारी वसाहत होणे गरजेचे आहे या विषयीही मागणी करण्यात आली.
सर्वसामान्य ग्रामीण जनतेला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन वरील समस्यांबाबत निवेदन दिले. त्यावेळी मा.सरपंच राम शिंदे,मंगलमुर्ती बोअरवेलचे मालक मनमोहन बेंडके, प्रसाद चव्हाण व निनाद संसारे उपस्थित होते. मंत्री महोदयांनी या विषयी संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा