रत्नागिरी जिल्ह्यातील ओ.बी.सी.बांधवांची मागणी आगामी अधिवेशनात मांडणार

 रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी जिल्ह्यातील ओ.बी.सी. बांधवांच्या विविध मागण्या आगामी अधिवेशनात मांडून, ओ.बी.सींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही आमदार राजन साळवी यांनी राजापूर येथील कार्यक्रमात दिली. 

मराठा आरक्षण देत असताना ओबिसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. यामुळे समस्त ओबिसी समाजाचे नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आंदोलने, बैठका घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन ओबिसी संघर्षवारी, आमदारांच्या दारी या उपक्रमांतर्गत राजापूर विधानसभा मतदारसंघातील ओबिसी बांधवांनी राजापूर पंचायत समिती सभागृहात सभा आयोजित करुन आमदार राजन साळवी यांना निवेदन सादर केले. 

यावेळी दिपक बेंद्रे, मनोहर गुरव, वसंत घडशी, अॅड.शशिकांत सुतार, राजापूर कुणबी बँकेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, जिल्हा परिषद सदस्य दिपक नागले, योगेश नकाशे, पंचायत समिती सभापती प्रमिला कानड़े, उपसभापती उन्नती वाघरे, राविकांत भामत आदी उपस्थित होते.



Comments