चिवेली येथे सहा हजारांची दारू जप्त
चिवेली गावठाणवाडी येथे 6982 रुपयांची देशी व विदेशी दारू विनापरवाना आपल्याजवळ बाळगल्या प्रकरणी संदेश श्रीकृष्ण शिर्के (36) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलिस नाईक सत्यजित दरेकर यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दि.1नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

Comments
Post a Comment