चिपळूणच्या नगरसेवकांनी घेतली महसूलमंत्र्यांची भेट...

  नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी केलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी केली तक्रार


चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा  नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी केलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, यावर निर्णयास विलंब होत असल्याचा   आरोप काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नगरसेवक सुधीर शिंदे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला होता. या पार्श्वभूमीवर  आमदार शेखर निकम यांच्यासह काँग्रेसचे गटनेते ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे, माजी नगरसेवक शिरीष काटकर आदी नगरसेवकांनी सोमवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.


काही दिवसांपूर्वी महा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी केलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तक्रार केली असून नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना पदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. मात्र या तक्रारीसंदर्भात निर्णयास विलंब होत असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला असून काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे व काँग्रेसच्या नगरसेविकांनी जिल्हाधिकार्‍यांविरोधात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. यानुसार आमदार शेखर निकम यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बिलाल पालकर, माजी नगरसेवक महंमद फकीर, नगरसेवक करामत मिठागरी, नगरसेविका सफा गोठे, सीमा रानडे, संजीवनी शिगवण आदी उपस्थित होते.



Comments