सात महिने चोवीस दिवसानंतर उद्या ज्योतिबाचे मंदिर उघडणार


महाराष्ट्र शासनाने मंदिरे व सर्व धार्मिक स्थळे खुली करणेबाबत जाहीर केलेनंतर पश्चिम महाराष्ट्र  देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्या व्यवस्थापने खाली असलेल्या  3067 मंदिरापैकी जोतिबा हे मंदिर प्रमुख आहे वाडी रत्नागिरी देवस्थान कडे भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. 

ज्योतिबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सकाळी नऊ ते बारा व दुपारी चार ते सात या वेळेत खालील अटी नुसार नियमाचे पालन करून दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहे. दिनांक 16 /11 /2020 पासून मंदिर फक्त दर्शनासाठी खुले राहणार आहे यामध्ये दर्शना विषयी कोणतेही धार्मिक विधी, होमहवन पुजा, अभिषेक भक्ताना करता येणार नाहीत. देवस्थान समिती यामध्ये  शासकीय नियमाप्रमाणे

कालानुरूप आवश्यक ते बदल करणार आहे.  दर्शनासाठी 16 / 11 / 2020 रोजी मंदिरात प्रवेश करण्यापुर्वी भाविकांनी तोंडावर मास्क लावूने प्रवेश करने अावश्यक अाहे.  दर्शनासाठी  कोरोना योध्दा यांना प्रथम दर्शनास प्रवेश दिला जाणार आहे. त्यांनी कोरना काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी आपली सेवा चांगल्या प्रकारे दिली त्यांना प्रथम दर्शन घेण्यास प्राधान्य देण्यात येईल.

धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार केले जातील. त्या व्यतिरिक्त अन्य कार्यक्रमास पूर्णपणे बंदी राहील. मंदिरामध्ये  सतत स्वच्छता कर्मचारी कार्यरत राहणार असून सकाळी दर्शनापूर्वी, दर्शन मार्ग व दर्शनाची जागा सॅनिटायझर करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9 ते 12 या वेळेत दर्शन झाल्यानंतर पुन्हा दर्शन मार्ग व दर्शनाची जागा सॅनटाईझ करण्यात येणार असून, त्यानंतर दुपारी ४ते ७ या वेळेत दर्शन चालू राहणार आहे.

भावीकांना  पश्चिम दरवाजातून  जोतिबा मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे व दक्षिण दरवाजातून बाहेर जाण्याचा मार्ग करण्यात आला आहे. अत्यावशक सेवेसाठी मंदिराच्या शेजारी एक ॲम्बुलन्स ची सोय करण्यात आली आहे. तसेच मंदिरांमध्ये असलेल्या प्राथमिक उपचार केंद्रामध्ये आवश्यकतेनुसार डॉक्टर उपलब्ध करण्यात येणार आहे. भाविकांनी दर्शन करतेवेळी 

दर्शन रांगेत ६ फूटअंतर ठेवावे. तसेच कमीत कमी साहित्य आपल्या जवळ बाळगण्याचे  आहे. शासनाकडील दिलेल्या नियमास अनुसार दहा वर्षापेक्षा कमी वय, व 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना मंदिरात प्रवेश देऊ नये किंवा या वयोगटातील भाविकांनी स्वतःच 

 येऊ नये. जे भाविक दर्शनासाठी येणार आहेत,त्यांनी वयाच्या पुरावा म्हणून आधार कार्ड अथवा शासकीय मान्यता प्राप्त असलेले जन्मतारखेचा पुरावा असलेली कार्ड सोबत घेऊन येणाऱ्या व्यक्तीनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच जे भाविक पंधरा दिवसापुर्वी  आजारी होते, त्यांनी दर्शनास मंदिरामध्ये येऊ नये. 

जेणेकरून अन्य भाविकांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. मंदिराबाहेर कोरोना रोगाचे अनुषंगाने सूचना फलक लावण्यात येणार असून, त्याप्रमाणे भाविकांनी सूचनांचे पालन करून देवस्थान समिती व प्रशासनास सहकार्य करावे. भाविकांनी साहित्य घेऊन मंदिरामध्ये येऊ नये. 

आपले  साहित्य मंदिराच्या बाहेर आपल्या जबाबदारीवर ठेवावे.फक्त दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश करून समितीस सहकार्य करावे. तसेच भाविकांचे दर्शन झाल्यानंतर त्यांनी तात्काळ मंदिरातून बाहेर जावे.  मंदिरात,  मंदिराच्या आवारामध्ये बसू नये जेणेकरून गर्दी होणार नाही.  

स्वच्छते राखणे, भाविकांना चांगल्या प्रकारे दर्शन देणे कामी देवस्थान समिती अावश्यक ती काळजी घेत आहे व त्यास भाविकांनी सहकार्य करून मंदिर आवारामध्ये गर्दी करु नये. अाज कोल्हापूर येथे सामितिच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत निर्यण घेण्यात अाला. सध्या जोतिबा डोंगरावर आनंदाचे  वातावरण अाहे. 

व्यापारी,  पुजारी वर्ग ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेला आहे. कधी एकदा नाथाचे दर्शन घेईन असे भावीक भक्ताना झाले आहे. त्यामुळे उद्यापासून चांगभंल्याची ललकारी कानावर पडणार अाहे आणि भाविक भक्तांना ज्योतिबाचे दर्शन मिळणार आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरीक व्यापारीवर्ग हे आनंदाने भारावून गेले आहेत.




Comments