शिक्षक सेनेकडून श्री. रविंद्र तहकिक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
शिक्षकांबद्दल आक्षेपार्ह संपादकीय लेख लिहणाऱ्या रविंद्र तहकिक या कार्यकारी संपादकांवर व दैनिक 'लोकपत्र' वर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे निवेदन एका पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी महोदय व मा. जिल्हा अधीक्षक महोदय यांना करण्यात आले.
त्यावेळी शिक्षक सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. संदीप कांबळे , महिला जिल्हा संघटक सौ.साजिदा दसुरकर, जिल्हा उपाध्यक्ष मा. मंदार सावंत, रत्नागिरी तालुका अध्यक्ष तौफीक शेख, तसेच रत्न सिंधू संस्थेचे अध्यक्ष व शिक्षक सेना संघटनेचे धडाडीचे क्रियाशील कार्यकर्ते सुनील जाधव , गडकरी एम.ए., ए. एल. काद्री, एस, एस. जमादार इत्यादी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आपल्या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी मा. भडकवाल साहेब व पोलीस अधीक्षक कार्यालयात होम डी.वाय.एस पी. मा. पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आली. यावेळी मा. भडकवाल व मा. पाटील साहेब यांनी निवेदनावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.


Comments
Post a Comment