रत्नागिरी जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जागतिक शौचालय दिनानिमित्त १७ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
रत्नागिरी दि 19:१७ नोव्हेंबर ते दि .२७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत . स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत जिल्हयातील हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक | वैयक्तिक , शाळा व अणवाडयामध्ये स्वच्छतेमध्ये सातत्य कायम राहण्यासाठी तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन , शौचालयाची योग्य देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत दि .१९ नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिनानिमित्त दि .१७ नोव्हेंबर ते दि .२७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत .
जिल्हयातील ग्रामपंचायतीमध्ये
सार्वजनिक / वैयक्तिक , शाळा व अंगणवाडी शौचालय बांधकाम करणे , निधी वितरण , देखभाल दुरुस्ती तसेच स्वच्छतेमध्ये सातत्य कायम राहण्यासाठी जनजागृती करणे , सार्वजनिक शौचालयामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करणे , सार्वजनिक शौचालयांना वीज जोडणी करणे , सार्वजनिक शौचालय परिसर स्वच्छता , वैयक्तिक शौचालयाची स्वच्छता आणि सुशोभिकरण , सार्वजनिक शौचालय , शाळा , अंगणवाडी . ग्रामपंचायत कार्यालयातील इ . नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती व वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम व अनुदान वाटप इ . उपक्रम राबविले जाणार आहेत . सदरचे उपक्रम राबविताना कोरोना विषाणूच्या प्रार्दुभाबाबत आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे .
जिल्हयातील शाश्वत स्वच्छतेमध्ये सातत्य कायम ठेवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीने उत्स्फुर्त सहभाग घ्यावा असे आवाहन मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) श्री.ओ.बी.मरभळ यांनी केले आहे .

Comments
Post a Comment