कॉंग्रेसच्या सह्यांच्या मोहिमेसाठी राजापूरात कॉंग्रेसला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी विधयकाला विरोध करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन तयार करुन सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. या सह्यांच्या मोहिमेसाठी राजापूरातील जनतेचा कॉंग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेसाठी माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफे, नगराध्यक्ष जमीर खलिफे व कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर विशेष परिश्रम घेत आहेत.
शेतकरी, कामगार धोरणाविरुद्ध राष्ट्रपती यांना निवेदन देण्यासाठी राजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तालुक्यातील कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी केलेले निवेदन जिल्हा अध्यक्ष विजय भोसले यांना नुकतेच सुपूर्द करण्यात आले. यावेळी राजापूर तालुका अध्यक्ष सुभाष बाकाळकर, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हा उपाध्यक्ष आबा दुधवडकर, संजय कुवेसकर, लांजा तालुका अध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, कपिल नागवेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments
Post a Comment